जैवविविधतेचा ऱ्हास जैवविविधता किंवा जैविकविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जाती विविधता आणि जातीमधील संपन्नता. जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे "जैवविविधता म्हणजे जनुकांची व्यक्तता ,जातीमधील विविधता आणि परिसंस्थांतील विविधता. तसेच जैवविविधता म्हणजे आसपासचा निसर्ग,प्राणी,पशु,कीटक,पक्षी व सूक्ष्मजीव आहेत. सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता हि एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता ३ स्तरांवर दिसून येते. १. जनुकीय विविधता २. जातिविविधता ३. परिसंस्था विविधता जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळतेच ,एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्येसुद्धा सारखेपणा आढळुन येत नाही. सजीवांमधील विविधता, पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर ,समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर ,भूप्रदेशाच्या गुणधर्मावर आणि सभोवताली असणाऱ्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. जैवविविधता परिसंस्था टिकवून...
Posts
Showing posts from October, 2019