जैवविविधतेचा ऱ्हास
जैवविविधता किंवा जैविकविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जाती विविधता आणि जातीमधील संपन्नता.
जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे "जैवविविधता म्हणजे जनुकांची व्यक्तता ,जातीमधील विविधता आणि परिसंस्थांतील विविधता. तसेच जैवविविधता म्हणजे आसपासचा निसर्ग,प्राणी,पशु,कीटक,पक्षी व सूक्ष्मजीव आहेत. सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता हि एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता ३ स्तरांवर दिसून येते. १. जनुकीय विविधता २. जातिविविधता ३. परिसंस्था विविधता
जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळतेच ,एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्येसुद्धा सारखेपणा आढळुन येत नाही. सजीवांमधील विविधता, पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर ,समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर ,भूप्रदेशाच्या गुणधर्मावर आणि सभोवताली असणाऱ्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कार्बनडायॉकसाईड चक्र सुरळीत राहते. हवेचे सर्व घटक संतुलित राहतात.जलचक्र सुरळीतपणे सुरु राहते. जलचक्रामुळे पाणी शुद्ध होते. जमिनीची धूप थांबते.अश्मयुगापासून मानवी हस्तक्षेपामुळे सजीव जातींचा विनाश व्हायला प्रारंभ झाला. याआधी नैसर्गिक आपत्ती हेच फक्त जातीविनाशाचे एकमेव कारण होते. जीवाश्मांच्या अभ्यासावरून अशमयुगापासून जातीविनाशाचा वेग शंभर ते दहा हजार पटींनी वाढल्याचे सिद्ध झाले.
संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे पण हे जैववैविध्य टिकवण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत.पर्यावरण संवर्धन ,जैवविविधता यांसारखे शब्द सध्या खूपच परवलीचे आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जविविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल.
जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे. त्या प्रजातींमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो. या बाबींचे विश्लेषण केल्यासच कळून येईल.उदा अनेकप्रकारची झाडे-झुडुपे,वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले ,तर फळमाशी,मधमाशी,फुलपाखरे, पक्षी ,प्राणी तर वाढतीलच ,पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी पोफळी आंबा,काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील असेही आढळून आले आहे ,कि परिसरातल्या टेकड्या,डोंगर यावर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे ,डोह ,विहिरी लवकर आटत नाहीत.
जैवविविधता ऱ्हासाची प्रमुख कारणे :
१ एखादी जाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत जाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षांत जगातील जैवविविधतेचरे १५% नुकसान झाले आहे व अशा जाती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत.
२ जाती नष्ट होण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे जातींच्या नैसर्गिक जातींच्या अधिवासात झालेली घट .विशेषतः पश्चिम घाटात शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नष्ट झाले आहे त्यामुळे माणसे व वन्यप्राणी यातील संघर्ष वाढीला लागला आहे.
मानवी हस्तक्षेपांमुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास-
मानवाच्या विविध कृतींचा परिसंस्थांच्या वाऱ्यावर विविध पातळ्यांवर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे परिसंस्थांचा ह्रास होतो.उदा खाणकाम आणि मोठ्या प्रामाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात.
विविध मानवी प्रक्रिया व कृती ,परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात.
परिसंस्थांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही प्रक्रिया व कृती:
१ लोकसंख्या वाढ आणि संसाधनांचा वाढलेला वापर
२ स्थलांतर
३ शहरीकरण
४ औद्योगिकरण व वाहतूक
५ झूम प्रकारची शेती
६ पर्यटन
७ मोठी धरणे
या प्रक्रियांचा परिसंस्थांवर परिणाम होत असल्याने त्या काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप व परिसंस्थांचा ऱ्हास यांमधील परस्पर संबंध समजून घेणे गरजेचे आहे.
आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर संकट येत आहे. सशहरीकरण ,वाढत जाणारी लोकसंख्या ,जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास,जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधन संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जैवविविधता संवर्धनासाठी लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही.पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे.अनेक प्रजाती एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत.त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण आणि जैवविविधतेचे संपन्न अभयारण्य म्हणजे कोयना अभयारण्य आहे . यामध्ये पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो. भारतातील संकटग्रस्त पक्षी -वनपिंगळा.
हा जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण स्वतः पासूनच प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे.
"पर्यावरणविषयक नियम पाळा",
"जैवविविधतेचा ऱ्हास टाळा".
👌👌
ReplyDeleteMast👌
ReplyDeleteGreat effort
ReplyDeleteछान लिहिलंस!
ReplyDeleteKhup Chan... jabardast lihilais.. great
ReplyDeleteखूप छान !!!
ReplyDelete